Pages


चंद्रकळेच्या किरणांमध्ये,
व्यथा लोपल्या शतजन्मीच्या,
व्याकुळलेल्या रात्रीला ह्या,
कळा लागल्या नव्या उद्याच्या !

चंद्रकळेच्या किरणांमध्ये,
स्वप्न सनातन फुलते आहे,
ओथंबलेल्या तिमीरांतूनही,
ज्योत चिरंतन जळते आहे !

चंद्रकळेच्या किरणांमध्ये,
साथ रुपेरी दाटुन आली,
थरथरणारी आस एकटी,
पुन्हा चांदणे माळून गेली !

3 comments

  1. SAurabh Garg on April 5, 2010 at 11:47 PM

    great insight in ur poem....

     
  2. Harshad Kumbhar on May 6, 2010 at 2:36 AM

    hiii , nice blog, and nice poems .

    www.harshadkumbhar.blogspot.com

     
  3. Unknown on November 22, 2014 at 9:59 AM

    WoW!!!