Pages

एकेक रंग
एकेक रेषा

एकेक आकार
जोडतेय...
अनंतकाळ...
चित्र नाही
निदान
कोलाज तरी....?


***

थोडा बेभान वारा
थोडा उधाण सागर
थोडा रिमझिम पाऊस
थोडे काजळकाळे ढग
थोडे श्रावणउन्ह
आणि थोडेसे सूर...विखुरलेले...

कोलाज पूर्ण...!